MAR 211 - स्वातंत्र्योत्तर वाड्मयीन प्रवाह प्रश्न संच

 MAR 211 - स्वातंत्र्योत्तर वाड्मयीन प्रवाह प्रश्न संच 



 १. आधुनिकतावादी साहित्य लेखन संदर्भात सविस्तर टिपणी लिहा.


 २.ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचा प्रारंभ सांगून ग्रामीण म्हणजे काय हे स्पष्ट करा.


 ३.स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय हे सांगून स्वातंत्रोत्तर कालखंडातील स्त्रीवादी साहित्याची भूमिका स्पष्ट करा.


४.मराठी रंगभूमीची पार्श्वभूमी सविस्तर विशद करा.


५.प्राचीन साहित्य म्हणजे काय ? थोडक्यात लिहा.


६.समकालीन साहित्य म्हणजे काय ?


७.नवकाव्याची पाच वैशिष्ट्ये सांगा.


८. नव्या लघुकथेची पाच वैशिष्ट्ये सांगा.


९.कोणतेही पाच कादंबरीकारांची नावे लिहा.


१०.कोणत्याही पाच नाटककारांची नावे लिहा.


११.मार्क्सवादाबद्दल आपल्या शब्दात माहिती लिहा.


१२.पाच स्त्री आत्मचरित्राची नावे लिहा,


१३.ग्रामीण आणि नागर समाजाचे वेगळेपण सांगण्यासाठी ए. आर. देसाई यांनी सांगितलेले पाच निकष सांगा. 


 १४.ग्रामीण साहित्याची चळवळ आणि ग्रामीण साहित्य ह्याबद्दल थोडक्यात लिहा.


१५.ग्रामीण साहित्याच्या मर्यादा सांगा.


 १६.प्रमाण भाषा म्हणजे काय ? ते सांगून प्रमाण भाषेची सारतत्त्वे लिहा,


 १७.महात्मा गांधी यांच्याविषयी थोडक्यात लिहा.


१८.दलित साहित्यात प्रकट होत असलेल्या दलित जाणिवांचे पाच विशेष लिहा.


१९.दलित साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


 २०.'घोटभर पाणी' ह्या एकांकीमध्ये कोणता विषय रेखाटला आहे?


 २१.'फिमेल', 'फेमिनाईन' आणि 'फेमिनिस्ट' ह्या शब्दाचे अर्थ नीटपणे समजावून सांगा.


२२.ना. धो. महानोर यांची 'कविता' ह्या कवितेचा थोडक्यात आशय लिहा.


२३.स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कवितेचे स्वरूप थोडक्यात लिहा.


२४.'साधुवाण्याची गोष्ट' ह्या कथेचा थोडक्यात आशय लिहा.


BOOK DOWNLOAD

Post a Comment

0 Comments