123 : व्यावसायिक अर्थशास्त्र - II (FYBCOM) || Question Bank || Marathi
खर्च व प्राप्ती
प्र. १ ला. खालील संकल्पना स्पष्ट करा.
१) एकूण प्राप्ती.
२) सरासरी प्राप्ती.
३) एकूण स्थिर खर्च.
४) सरासरी बदलता खर्च.
प्र. २ रा. दीर्घोत्तरी प्रश्न.
१) पूर्णस्पर्धा बाजारपेठेतील सरासरी प्राप्ती व सीमान्त प्राप्ती संकल्पना स्पष्ट करा.
२) दीर्घकालीन सरासरी खर्चवक्र विश्लेषण स्पष्ट करा.
पूर्णस्पर्धा बाजारामधील किंमत व उत्पादन निश्चिती
प्र. १ ला. रिकाम्या जागा पूर्ण करा.
१) ............. या बाजारपेठेमध्ये सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमान्त प्राप्ती वक्र एकच
असतात.
२) ..............बाजारामध्ये उत्पादकांची संख्या असंख्य असते.
३) एकजिनसी वस्तूहे .............. स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
प्र. २ रा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) पूर्णस्पर्धा आणि शुद्ध स्पर्धाया संकल्पनेमध्ये कोणताही फरक नाही.
२) पूर्णस्पर्धेमध्ये ग्राहक आणि विक्रेत्याला बाजाराचे पूर्ण ज्ञान असते.
३) मक्तेदारी व पूर्णस्पर्धा बाजारामधील मागणी वक्र सारखेच असतात.
४) उद्योग-संस्थेच्या समतोलासाठी सीमान्त खर्च वक्र सीमान्त प्राप्ती वक्राला वरच्या
बाजूने छेदून जातो.
प्र. ३ रा. लघुत्तरी प्रश्न.
१) पूर्णस्पर्धेची वैशिष्ट्ये सांगा.
प्र.४ था. दीर्घोत्तरी प्रश्न.
१) पूर्णस्पर्धा म्हणजे काय? पूर्णस्पर्धेमधील उद्योग-संस्था व उद्योगाचा अल्पकालीन
समतोल व उत्पादन निश्चिती स्पष्ट करा.
२) पूर्णस्पर्धा म्हणजे काय? पूर्णस्पर्धेतील उद्योग-संस्था व उद्योगाचा दीर्घकालीन
समतोल स्पष्ट करा.
अपूर्णस्पर्धा बाजारस्थितीमधील किंमत व उत्पादननिश्चिती
प्र. १ला. रिकाम्या जागा भरा.
.............. हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार व अल्पविक्रेता अधिकारी बाजारातील विक्रेत्यांची संख्या
...... असते.
प्र. २रा. चूक की बरोबर ते लिहा.
द्वयाधिकारी बाजारपेठेत असंख्य ग्राहक असतात.
मूल्यभेद करता येण्यासाठी दोन ग्राहकांच्या मागणीची लवचिकता समान असावी लागते.
स्मार्टफोन हे द्वयाधिकार बाजारपेठेचे उदाहरण आहे.
प्र. ३रा. लघुत्तरी प्रश्न.
अपूर्णस्पर्धा व पूर्णस्पर्धा संकल्पना स्पष्ट करा.
बाकदार मागणीवक्र संकल्पना स्पष्ट करा.
द्वयाधिकारी बाजारपेठेची संकल्पना स्पष्ट करा.
प्र. ४था. दीर्घोत्तरी प्रश्न.
मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय? मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील किंमत व उत्पादन निश्चिती
स्पष्ट करा.
अल्पविक्रेता अधिकारातील किंमत व उत्पादन निश्चिती स्पष्ट करा.
उत्पादन घटकांची मूल्येनिश्चिती
प्र. १ ला. रिकाम्या जागा पूर्ण करा.
१) प्रा. जे. बी. क्लार्क यांच्या मते नफा हा घटक मोबदला ............... अर्थव्यवस्थेत
आढळून येतो.
२) नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत............... यांनी मांडला.
३) नवप्रवर्तन केल्यामुळे उत्पादनाच्या या............... घटकाला नफा प्राप्त होतो.
४) नफ्याला अनिश्चितता वहन सिद्धांत............... यांनी मांडली.
प्र. २ रा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) नफ्याची निर्मिती स्थितिशील अर्थव्यवस्थेत होते.
२) नफा हा ऋण स्वरूपाचा असू शकतो.
३) विमायोग्य जोखीम पत्करल्यास नफा मिळतो.
४) नवप्रवर्तनामुळे निर्माण होणारा नफा अस्थायी स्वरूपाचा असतो.
प्र. ३रा. लघुत्तरी प्रश्न.
१) नफा म्हणजे काय? थोडक्यात अर्थ स्पष्ट करा.
२) नफ्याचा गतिशीलता सिद्धांत स्पष्ट करा.
प्र. ४था. दीर्घोत्तरी प्रश्न.
१) नफ्याचा नवोन्मेष सिद्धांत स्पष्ट करा.
२) नफ्याचा धोका आणि अनिश्चितता सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण करा.
0 Comments