YCMOU B.A. Second-year PSY 216 solved Assignments 2022
B. A. 2nd Year PSY 216 मी आणि माझे वर्तन गृहपाठ उत्तरे
🔹अवधान आकर्षित कराणारे व्यत्तिनिष्ठ नियामके सविस्तर स्पष्ट
🔹मानवी वर्तनातील बिघाड नाहीसा करण्यासाठी अभिजात अभिसंधान प्रक्रियेचा कसा वापर करता येईल ते उदाहरणाच्या साहय्याने स्पष्ट करा.
🔹सर्जनशिलतेतील स्थित्यंतरे निर्माण होण्यास कारणीभूत असणारे घटक सविस्तर स्पष्ट करा.
🔹भौमीतीक श्रमाचे कोणतेही पाच प्रकार स्पष्ट करा.
उतर-
आपला असा अनुभव असतो की, वस्तूघटना जशा प्रत्यक्षात असतात तशाच त्या दिसतात परंतु अनेक अभ्यासकांच्या निरीक्षणावरून असे दिसते की, काही वेळा दृष्टिपटलावरील प्रतिमा वेगळी असली तरी वस्तू आहे तशीच दिसते, तर काही वेळा वस्तू असते त्यापेक्षा वेगळीच दिसते. कधीकधी वस्तू जशी असते त्याहुन वेगळी दिसते. तर कधीकधी वस्तू असते एक; तर दिसते दुसरीच. ज्या वेळी एखाद्या उद्दीपकाला चुकीचा अर्थ किंवामिथ्या अर्थबोधंदिला जातो तेव्हा संवेदनप्रक्रियेत चूक घडली असे मानले जाते. चुकीचे संबेदन म्हणेजे श्रम होय. उद्दीपक वस्तूला चुकीचा अर्थ दिल्याने मिथ्यासंवेदन होते. संवेदनातील ही चूक आहे. उदाहरणार्थ, अनवाणी पायाने रात्री जाताना दोरास साप म्हणून समजणे, वाळलेल्या पालापाचोळ्याच्या आवाजाला अंधारात घातक प्राणी समजणे. तसेच सरकारी इमारतीवरील दिव्यांची रोषणाई पाहताना गतीचा भास होतो; म्हणजे दिवे स्थिर असून दोन दिव्यांच्या लागणे बंद होणे यांतील अत्यल्प मध्यंतरामुळे दिवे पुढे सरकत असल्याचे मिथ्या प्रत्यक्ष होते. म्हणजे भासमान गतीचे संवेदन होते. ही सर्व श्रमाची उदाहरणे आहेत.
'संवेदनातील चूक म्हणजे भ्रम. वस्तू ज्ञानेंद्रियांच्या स॑ंनिकर्षांत आल्यानंतर त्या वस्तूचा चुकीचा किंवा मिथ्या अर्थबोध होतो त्यांस 'श्रम' म्हणावे.' उद्दीपकांना व संकेत चिन्हांना चुकीचा अर्थ देणे म्हणजे भ्रम. भ्रम हे इंद्रिय-श्रम असतात. भ्रमात बाह्य उद्दीपकाचे वेदन असते पण त्या वेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो. श्रम हे सर्वांनाच जाणवतात, अनुभवाला येतात. एखाद्या घटनेपासून बरेचदा सर्वांनाच सारखेच श्रम जाणवतात.
भ्रमाचे प्रकार-
१ व्यक्तिगत श्रम
२.सामान्य भ्रम
सामान्य श्रमाचे भौमितिक श्रम हे उत्कृष्ट उदाहरण आहे. भौमितिक 'भ्रंमाचे प्रामुख्याने दोन
प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते.
(१) विरोधात्मक भ्रम व समावेशनात्मक भ्रम
(२) विस्तारविषयक, दिशाविषयक व त्रिमितीविषयक भ्रम
बहुतेक सर्व भौमितिक भ्रम सार्वत्रिक असतात. आकृतीचे व रेषांच्या लांबीरुंदीचे पूर्वज्ञान असले तरी असे श्रम स्वाभाविक व अपरिहार्यपणे अनुभवाला येतातच.
विरोधात्मक श्रमामध्ये परिसरातील उंद्दीपकामुळे मूळ उद्दीपकाच्या संवेदनावर प्रभाव झालेला दिसतो. एखादी बुटकी व्यक्ती दोन उंच व्यक्तींमध्ये उभी राहिल्यास ती बुटकी व्यक्ती अधिकच बुटकी वाटते: यास 'विरोधात्मक श्रम' म्हणावे. परंतु बाजूच्या उंच व्यक्तीमुळे ती उंच व्यकती आहे त्यापेक्षा अधिक उंच असल्याचे भासले हा समावेशनात्मक भ्रम आहे.
विस्तारविषयक, दिशांविषयक व त्रिमितीविषयक भ्रम हे विविध प्रकारचे, अनेक भौमितिक आकृतींचा वापरे "करून कसे अनुभवाला येतात हे सहज लक्षात येते. भौमितिक श्रम संबेदनातील'सार्वत्रिक चूक आहे. अशा भौमितिक श्रमाचे प्रकार
१.ल॑ब पाया श्रम
२. म्यूलर-लायर भ्रम
३.पोगेनडॉफॅ भ्रम
४.हेरिंगचा भ्रम
५ पोंझो भ्रम
६.झूलनरचा भ्रम
७.गतीचा भ्रम
८.त्रिमीतीविषयक भ्रम
९.आकृतीचे पश्चात परिणाम
🔹अवधान आकर्षित कराणारे व्यत्तिनिष्ठ नियामके सविस्तर स्पष्ट करा.
उत्तर-(१) अभिरुची व मूल्ये-
स्वत:च्या आवडीनिवडीत अभिरुची व मूल्यानुसार कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावयाचे व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष याबाबत व्यक्ती निर्णय घेत असते. आपण आपल्या अभिरुची व आवडीनुसार ठरावीक गोष्टीकडे लक्ष देत असतो. समजा एक वनस्पती शास्त्रज्ञ, एक शेतकरी व एक निसर्ग चित्रकार असे तिघे एका टेकडीवर बसून सभोवताली पाहत आहेत. त्यांच्या अभिरुचीनुसार ते त्यासंबंधित निरनिराळ्या वैशिष्ट्यांना पाहतील. चित्रकाराचे लक्ष निसर्गसौंदर्याकडे जाऊन अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या लालभडक किरणामध्ये त्याला वेगळेपण जाणवेल, वनस्पतीशास्त्रज्ञास समोर असलेल्या वनस्पतीची वैशिष्टये आढळतील तर शेतकरी जमिनीची जात कोणती हे पाहील. व्यक्तीच्या अभिरुची असणारा या सापेक्षतः टिकाऊ व स्थायी प्रवृत्ती असल्यामुळे गणितात वा संगीतात जाते. अभिरुची असणारा विद्यार्थी वर्गात गणिताच्या तासाकडे वा संगीताच्या बारकाईने लक्ष देईल. पण आवड हाच विद्यार्थी भूगोलाच्या तासाला लक्ष देणार नाही. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात मूल्यांना महत्त्वाचे स्थान असते. लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या मनुष्याला हवूमशाही
लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या मनुष्याला हुकूमशाही प्रवृत्तीच्या राजकारणात रस असू शकत नाही. अनेकदा पैशाचे मूल्य त्याच्या जीवनात महत्त्वाचे आहे तो शिक्षणाला दुय्यम महत्त्व देतो.
(२) मानसिक तत्परता-
कोणत्याही विशिष्ट क्षणी वा वेळी मनुष्याचा कल ज्या गोष्टीकडे असतो त्याकडे त्याचे आपोआप लक्ष जाते. ध्यानस्थ वाटणारा बगळा जलाशयाच्या काठी माशाची शिकार शोधत असतो. जीवन सुसंस्कारित व्हावे म्हणून अभ्यासक चिंतनात मग्न होतो, ते त्याच्या मानसिक तत्परतेचे द्योतक आहे.
(३) प्रेरणा व गरजा-
ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रेरणा व गरजा जागृत होतात त्यांना अनुसरून संबंधित समर्पक गोष्टीकडे एखाद्या व्यक्तीचे अवधान आकर्षित होते. भूक लागली म्हणजे भुकेची प्रेरणा तृप्त करणाऱ्या गोष्टीकडे लक्ष जाईल. प्रेरणा तृप्त झाल्यावर तिचे महत्त्व काहीसे कमी होते. अभ्यासाला बसल्यानंतर क्रमांक १ ची पुस्तिका सापडत नसते व ती अभ्यासासाठी आवश्यक आहे ही गरज निर्माण होताच ती पुस्तिका सापडेपर्यंत विद्यार्थ्याची अवधानाची क्रिया सुरू राहते. होस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी पोस्टमनची उत्कंठतेने वाटच पाहतो, कारण मनीआर्डर येणार असते ना! प्रत्येक व्यक्तीच्या काही तात्कालिक इच्छा असतात. नवीन चित्रपट पाहणे हे याचेच उदाहरण आहे. हे सर्व अवधान-प्रक्रियेतील तात्कालिक, अस्थायी स्वरूपाचे प्रासंगिक घटक आहेत.
(४) भावना
भावनिक अवस्थेचा मनुष्याच्या अवधानावर बराच प्रभाव पडतो. आईला आपल्या मुलाचे दोष सहसा दिसत नाहीत पण शेजारच्या मुलाचे दोष चटकन दिसतात. ज्या व्यक्तीबद्दल आपले मन कलुषित असते तिचे गुणही दोषासारखे दीसतात. परीक्षा जवळ आल्यानंतर जर एखाद्या मित्राने महत्त्वाचे प्रश्न सांगितले तर ते प्रश्न आपण चांगले तयार करतो यातील सत्यासत्यता पडताळतानाही, हे सहजपणे आपल्या पक्षात येईल..
(५) सवयी
प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात काही सवयी आत्मसात रीत असतो. त्या संपादित, स्थायी स्वरूपाच्या सवयीनुसार त्या संबंधित गोष्टीकडे त्याचे स्वाभाविकपणे लक्ष खेचले जाते. सवयीमुळे मनुष्याची जडणघडण होत असते. स्वभाव बनत असतो. वाचनालयात जाऊन ॐ पुस्तकांच्या वाचनांची सवय जडलेल्या तास नसला की विद्यार्थ्याचे पाऊल आपोआप ग्रंथालयाकडे वळते. रोज सकाळी उत्तम नाष्टा करण्याची सवय असणारा परक्या गावात गेल्यानंतर प्रथम चांगल्या हॉटेलची विचारणा करतो.
(६) सामाजिक प्रेरणा
सामाजिक जीवनात स्वत:चे स्थान, दर्जा, प्रतिष्ठा समाजप्रिय मनुष्याला इतक्या महत्त्वाच्या वाटत असतात की त्यामुळे तो मनुष्य या सर्व गोष्टींसाठी कधी कधी तर मनाविरुद्धही वागत असतो. प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी सर्व प्रकारे दान देऊन आपल्या नावाच्या प्रसिद्धीसाठी तो संधींच पाहत असतो. दहा वर्षांपूर्वी स्वत:चा टुमदार बंगला, गाडी, दूरदर्शन संच असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. आज ती काही जणांना तरी आवश्यक गोष्ट झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती वेगळ्या पुस्तिकांत आलेली आहे. मनःस्थिती, अर्थपूर्णता,मनोन्यास, हेतू, ध्येय, वैयक्तिक अनुभव, स्वभाव व कल या घटकांचा प्रभाव कमी व अधिक प्रमाणात अवधानावर होत असतोच.
🔹मानवी वर्तनातील बिघाड नाहीसा करण्यासाठी अभिजात अभिसंधान प्रक्रियेचा कसा वापर करता येईल ते उदाहरणाच्या साहय्याने स्पष्ट करा.
उत्तर- अभिजात अभिसंधान (Classical Conditioning)
पॅव्हलॉव्ह व बेख्तेरेव्ह यांनी प्रस्थापित केलेल्या अभिसंधानास अभिजात अभिसंधात म्हणून ओळखले जाते. नोबेल पारितोषिक विजेता रशियन शरीरशास्त्रज्ञ पॅव्हला यांनी कुत्र्यावर केलेल्या प्रयोगावरून या अध्ययनप्रकाराची चर्चा सर्वत्र होऊ लागली. अभिसंधित प्रतिक्रिया संपादन करणे हे शिक्षणप्रक्रियेचे महत्त्वाचे अंग आहे. मानवप्राणी जीवनातील अनुभवांचे साहचर्य संबंध जोडतो. डॉक्टरला पाहून लहान मुले भितात व रडतात. परंतु प्रथम ज्या वेळी लहान मूल डॉक्टरला पाहते, त्या वेळी ते भीत नाही वा रडत नाही, परंतु डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याला मनस्वी शारीरिक वेदना होतात व ते रडू लागते. पुन्हा डॉक्टरला
पाहताक्षणीच रडू लागते. या वेळी त्या मुलाने डॉक्टर व इंजेक्शन यांचा साहचर्यसंबंध जोडला असतो. डॉक्टर इंजेक्शन देतो, इंजेक्शनने दुखते. डॉक्टरमुळे दुखते, असे समजून तो रडतो, त्याला डॉक्टरची भीती वाटते. भीतीने रडण्याचा खरा उद्दीपक इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन देणारी व्यक्ती डॉक्टर आहे त्यामुळे इंजेक्शन व डॉक्टर या दोहोंत मुलाने साहचर्य संबंध जोडला. डॉक्टरमुळे आता नव्याने त्याला भीती वाटू लागली. म्हणजे नवीन उद्दीपकाने पूर्वीचीच प्रतिक्रिया घडवून आणली. शिक्षकाच्या हातात छडी दिसताच वर्गातील दंगा करणारी मुले घाबरतात व शांत होतात. आश्रमशाळेत तीन वेळा सलग घंटी होताच सर्व मुले भयभीत होऊन हॉलमध्ये एकत्र जमतात. विशिष्ट उद्दीपकामुळे विशिष्ट प्रतिक्रिया घडणे नैसर्गिक आहे. परंतु प्रत्येक वेळी विशिष्ट उद्दीपक उपलब्ध होईलच असे नाही. दुसऱ्याच एखाद्या तटस्थ अनैसर्गिक उद्दीपकाने जर प्रतिक्रिया होऊ लागली तर ती प्रतिक्रिया अभिसंधित झाली असे म्हणतात. नित्याच्या व्यवहारात अभिसंधानाची अनेक उदाहरणे आढळतात. त्यातील काहींचा नमुना म्हणून वर उल्लेख केलेला आहे.
अभिजात अभिसंधानाची वैशिष्टे-
अभिसंधान प्रक्रियेची महत्वाची वैशिष्ट्ये पाहणे जरुरीचे आहे. त्यामुळे त्याचा काही व्यावहारिक उपयोग आपल्या जीवनात करू शकू. ही वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत-
१. दृढीकरण (प्रबलीकरण)
२. अनभिसंधित उद्दीपक व अभिसंधित उद्दीपकांतील समीपता
३.प्रस्थापित अभिसंधित प्रतिक्रियेचे विच्छेदन (विलोपण)
४.उत्स्फूर्त पुननिर्माण (पुनस्थापना)
५. सामायीकरण व भेदबोधन
६. उच्चश्रेणी अभिसंधान
७. अकरणरुप अभिसंधान
🔹सर्जनशिलतेतील स्थित्यंतरे निर्माण होण्यास कारणीभूत असणारे घटक सविस्तर स्पष्ट करा.
उत्तर- सर्जनशीलतेतील स्थित्यंतरे
सर्जनशील विचारप्रक्रियेवर जे काही संशोधन त्यावरून एक गोष्ट ध्यानात येते ती अशी की, सर्जन विचारांच्या विकासामध्ये निश्चित आकृतिबंध असतो. अगदी सुरुवातीस लहान मुलांच्या खेळण्यात सर्जनशीलता और आणि नंतर नंतर दैनंदिन शालेय प्रगती, करमणुकीचे खेळ. यांमध्ये दिसू लागते. वयाच्या ३० ते ४० या कालखंडात प्रत्येक व्यक्तीची ही सर्जनशीलता अत्युच्च टोकास पोहोचलेली आढळते. त्यानंतर मात्र एक प्रकारच्या पठार अवस्थेत ती स्थिर राहते किंवा उतरती कळा लागते. त्यासाठी अशक्त शरीरप्रकृती. कौटुंबिक वातावरण, आर्थिक ताण-तणाव. रिकाम्या/फरल्या वेळचा अभाव ही सर्व कारणे जबाबदारी आहेत. स्पॉक या संशोधकाच्या मते, 'पालकांचा बाल्यावस्थेतील पाल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावरच सर्जनशीलता सर्वस्वी अवलंबून असते.' सर्जनशीलतेमध्ये ही जी स्थित्यंतरे होतात किंवा बदल होतात. त्यात पुढील पाच घटकांचा प्रभाव पडतो.
(अ) लिंग
मुला-मुलींच्या तुलनेत मुले अधिक सर्जनशील असल्याचे आढळते. अर्थातच लिंगभेदानुसार मुला-मुलींना जी वेगवेगळी वागणूक दिली जाते त्याचाच हा परिणाम असल्याचे दिसून येते. स्वतंत्रपणे सर्व व्यवहार करता यावेत इतके स्वातंत्र्य मुलांना उपलब्ध करून दिले जाते. पुढाकार येऊन व्यक्तित्वगुण प्रदर्शित करता यावेत यासाठी पालक आणि शिक्षक हे मुलींपेक्षा मुलांनाच अधिक प्रोत्साहित करतात. यामुळेच मुलींपेक्षा मुले
अधिक सर्जनशील आढळतात. अर्थातच असे हे म्हणणे वादातीत मुळीच नाही. यावर असा एक आक्षेप घेण्यात येतो की, हे सर्वस्वी खरे आहे का? मुली किंवा स्त्रिया सर्जनशील नसतात का? असे प्रश्न उपस्थित होत असल्याने वरील म्हणणे कितपत खरे आहे अशी एक शंका येऊन जाते.
(आ) सामाजिक-आर्थिक दर्जा
व्यक्तीच्या सामाजिक-आर्थिक दर्जाचा तिच्या सर्जनशीलतेवर परिणाम होतो हे तर खरेच आहे. अर्थात असे असले तरी अपवादात्मक उदाहरणे भरपूर आढळतात. जी मुले उच्च सामाजिक-आर्थिक दर्जा असलेल्या कुटुंबात निपजलेली आहेत आणि त्यांना समृद्ध कौटुंबिक पार्श्वभूमी लाभते अशी मुले कनिष्ठवर्गीय मुलांच्या तुलनेत अधिक सर्जनशील असतात. अशा मुलांना 'लोकशाही' वातावरणात वाढल्याचा नक्कीच फायदा होतो. हुकूमशाही वृत्तीच्या पालकांमुळे मुलांची सर्जनशीलता कोठेतरी खंडित झाल्याचे आढळते. स्वत:च्या आवडी-निवडी, अभिरुची निवडण्याचे. जोपासण्याचे स्वातंत्र्य आणि संधी उच्चवर्गीय पालक आपल्या मुलांसाठी उपलब्ध करून देतात; एवढेच नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अगदी जागरूकतेने 'समृद्ध' कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जातात. या सर्व घटकांचा अगदी पुरेसा अनुकूल परिणाम या मुलांवर होतो व त्यामुळेच अशा उच्च वर्गातील मुले अधिक सर्जनशील आढळतात.
(इ) जन्मक्रम
मुलांचा जन्मक्रम आणि त्यांच्या व्यक्तित्वाची गुणवैशिष्टये यांच्यावर खुप संशोधन झालेले आहे. मुलांच्या जन्मक्रमाचा आणि त्यांच्यामधील गुणवैशिष्यांचा खुपच जवळचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. वेगवेगळ्या जन्मक्रमांच्या मुलांमध्येदेखील विविध प्रमाणातील सर्जनशीलता असल्याचे दिसते. हा जो फरक आढळतो याची कारणे अर्थातच वातावरणात सापडतात. वंशदायामुळे हा कमीअधिकपणा आढळतो असे म्हणणे गैरवाजवी ठरेल. सर्वात मोठ्या मुलावर पालकांची अनेक बंधने असतात, त्याच्याकडून खूपच अपेक्षा बाळगल्या जातात. त्यामुळे मोठ्या मुलांवर सदैव एक प्रकारचा तणाव असतो. यामुळे अशी मुले कमी सर्जनशील आढळतात. याउलट मधले मूल, सर्वात लहान मूल किंवा शेंडेफळ, तसेच एकुलते एक मूल अशी मुले अधिक सर्जनशील आढळतात. सर्वसाधारण कौटुंबिक वातावरणात जी काही बंधने असतात अशी सर्व बंधने 'एकुलत्या एक मुलाच्या बाबतीत शिथिल केल्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात अडथळे येत नाहीत. त्याला पुरेशी संधी मिळू दिली जाते. परिणामतः अशी मुले इतरांच्या तुलनेत अधिक सर्जनशील होतात.
(ई) कुटुंबाचा आकार
मर्यादित लहान कुटुंब आणि संख्येने अधिक असलेले मोठे कुटुंब यांमध्ये राहणाऱ्या मुलांची तुलना केली असता असे आढळले की, लहान अशा कुटुंबातील मुले ही अधिक सर्जनशील होण्याची शक्यता असते. एकत्र अशा कुटुंबात हुकूमशाही तंत्राने राहणाऱ्या व्यक्ती आणि विकासाची कमीतकमी साधने व संधी यामुळे मुलांच्या सर्जनशील विकासास चालना मिळत नाहीच शिवाय त्यात खूप अडथळे उद्भवतात. याउलट लहान कुटुंबात पालकांचे वैयक्तिक लक्ष मुलांवर असल्याकारणाने त्यांच्या प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने अनुकूल वातावरण निर्माण करून दिले जाते. त्यातही मध्यमवर्गीय पांढरपेशा म्हणून समृद्ध वातावरण मुलांना उपलब्ध करून देता येईल तितके ते दिले जाते. त्यामुळे मुले प्रोत्साहित तर होतातच शिवाय त्यांच्या सर्जनशीलतेस उद्युक्त केले जाते.
(उ) शहरी/ग्रामीण वातावरण
मुले ज्या वातावरणात राहतात त्याचा परिणाम मुलांच्या सर्वांगीण विकासावर होतोच होतो. शिवाय सर्जनशीलतेशीही या घटकाचा संबंध असल्याचे आढळते. ग्रामीण विभागातील मुलांच्या तुलनेत शहरी विभागातील मुले थोडी अधिक सर्जनशील असल्याची आढळतात. त्यातल्या त्यात ग्रामीण विभागामध्ये जी कुटुंबे असतात तेथे पालक अधिक हुकूमशाही प्रवृत्तीचे असतात. मुलांना अवास्तव स्वातंत्र्य देता कामा नये या विचारांमुळे आवश्यक तेवढे स्वातंत्र्यही न मिळू देणारे. मुलांचे फाजील लाड करावयास नकोत या अट्टाहासापोटी योग्य तेथेही कोडकौतुक न करणारे पालक यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेवर विपरीत परिणाम
होतात. तसेच ग्रामीण विभागात सर्जनशीलतेस म्हणावे तसे आणि आवश्यक तेवढे उत्तेजनदेखील दिले जात नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून ग्रामीण विभागातील मुले शहरी विभागातील मुलांच्या तुलनेत कमी सर्जनशील असतात.
0 Comments