YCMOU B.A Second year PSY 217 solved Assignments 2022

YCMOU B.A Second year PSY 217 solved Assignments 2022

B. A. 2nd Year PSY 217 बालसंगोपन व बालविकास गृहपाठ उत्तरे





🔹 प्रसुतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

🔹उच्चार दोषावरील उपाय सविस्तर स्पष्ट करा. उत्तर- उच्चार दोषांवरील उपाय

🔹 मुलांच्या निर्णय मानण्याच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.

🔹 अतिशिस्तीचे परीणाम स्पष्ट करा.



🔹प्रसुतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.


उत्तर- प्रसूतिपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक


प्रसूतिपूर्व काळात म्हणजे बाळाचा जन्म होण्यापूर्वी सुद्धा काही अडचणी उद्भवतात. फलित बीज, भ्रूण व गर्भाच्या वाढीवर वातावरणातल्या काही घटकांचा परिणाम होतो. साहजिकच गर्भाची वाढ अपेक्षेप्रमाणे न होता त्यात काही अडथळे येतात व परिणामी दोषही निर्माण होतात. बाळाच्या योग्य विकासात अडथळे आणणारे हे घटक कोणते आहेत ते आता आपण पाहू,


(क) आईचा आहार: आईने पोषक आहार न घेतल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो. वार व नाळेच्या द्वारा योग्य तो आहार मिळत असतो हे लक्षात ठेवले म्हणजे आहार सकस असणे किती आवश्यक आहे ते लक्षात; प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षार वगैरेंचा अभाव आईच्या आहारात असल्यास आईचेच वजन कमी होते असे नाही, पण जन्माला येणारे बाळही अशक्त होते.


(ख) आईचे वयः गर्भधारणा होण्यासाठी व मुलभ प्रसूतीच्या दृष्टीने आईचे २० वर्षे ते ३० वर्षे हे वय आदर्श मानले जाते. या कालावधीच्या आधी व नंतर गर्भधारणा होणे तितकेसे हितावह नाही. कारण आधीच्या वयात प्रजनन अवयवाची पूर्ण वाढ झालेली नसते व तिशी-पस्तीशीनंतरच्या काळात गर्भपात होणे, मूल मृत जन्मणे यांसारख्या अडचणी येऊ शकतात. अर्थात, प्रत्येक वेळी असे घडेल असे नाही.


(ग) औषधे, इत्यादी: औषधे, मद्यसेवन व धूम्रपान याचाही गर्भावर विपरित परिणाम होऊ शकतो. विशेषतः गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या म्हणजे साधारण तीन महिन्यांपर्यंत वरील गोष्टींचा उपयोग केला गेल्यास, गर्भामध्ये विकृती व इतर समस्या निर्माण होऊ शकतात. मुलाचे वय वाजवीपेक्षा कमी होते, गर्भपात होऊ शकतो. एवढेच नव्हे तर शारीरिक मानसिक विकृती / व्यंगे निर्माण होऊ शकतात...


(घ) आईचे भावविश्वः पुरातन काळापासून गर्भवती स्त्रीचे मन आनंदीत ठेवावे, असे सांगितले आहे. आईच्या भावनांचा गर्भावर परिणाम होतो असे जे म्हटले जाते त्याचे गमक हेच आहे. गर्भवती स्त्रीला फार काळ व अतिशय मानसिक तणावाखाली राहावे लागल्यास मूल चिडचिडे व अति चळवळे होऊ शकते. झोपेच्या व शी- सूच्या तक्रारी, कमी खाणे, असेही याचे इतर परिणाम आहेत.


(च) इतर घटक: जोराचे आवाज, एक्स-रे यासारख्या इतर काही घटकांचा गर्भावर दुष्परिणाम होतो. विशेषतः रेडीओशनमुळे अतिशय तीव्र स्वरूपाच्या विकृती मुलांमध्ये होऊ शकतात. जे धोक्याचे इशारे दिले आहेत त्यांपैकी काहींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. त्यासंबंधात अधिक माहिती मिळवून संभाव्य धोके टाळू शकतो. उदाहरणार्थ मद्यसेवन, धूम्रपान, किंवा कुपोषण. विशेषतः कुपोषण टाळण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे, खिशाला परवडणारे पण समतोल आहार असलेले पदार्थ आपल्या खाण्यात कसे समाविष्ट करावेत वगैरे बाबतीत आपण काळजी घेऊ शकतो. औषधाच्या बाबतीतही आपल्याला खबरदारी घेता येईल.


गरोदरपणात आई आजारी झाली, तर डॉक्टरही औषधे लिहून देतात. एखादे औषध बाळाला धोकादायक ठरणार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्या औषधासाठी पर्याय शोधू शकतो. अर्थात, काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ, गोवरासारखा आजार किंवा आईच्या व बाळाच्या रक्तगटातील भिन्नता (आर.एच. घटक) याबाबत आपण काही करू शकत नाही. पण याचे परिणाम काय असतात व सामान्य दुष्परिणामापासून आईचे व बाळाचे संरक्षण कसे करता येईल याबद्दल माहिती मिळवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी उपचार करू शकतो.





🔹उच्चार दोषावरील उपाय सविस्तर स्पष्ट करा. उत्तर- उच्चार दोषांवरील उपाय


उत्तर

(१) दोष लक्षात आल्यावर मुलाला न रागावता आधी तज्ज्ञ व्यक्तींकडून शारीरिक तपासणी करून घ्यावी. यांत स्वरयंत्रणा, नाक, कान, घसा, दात, जीभ, टाळू, ओठ या सर्व अवयवांची तपासणी करावी.


(२) ज्या अवयवांबाबत दोष आढळला असेल त्याबाबतच्या तज्ज्ञांकडून पुढील सल्ला घ्यावा. आवश्यक असल्यास छोटी शस्त्रक्रिया करून घ्यावी. उदाहरणार्थ, ओठ शिवून घेणे, दात सरळ करणे, कर्णबधीरत्व असल्यास शिक्षणाची संपूर्ण पद्धत बदलावी लागेल. त्यासाठी स्वतंत्र शाळा असतात. प्रशिक्षित शिक्षक असतात. त्यांची मदत घ्यावी.


(३) शारीरिक तपासणीबरोबरच मानसिक तपासणी आवश्यक असते. सर्दी-ताप आल्यास आपण सहजरित्या वैद्यकीय सल्ला घेतो. पण आपल्या समाजात मानसोपचाराबद्दल अकारण भीती असते. तिथे फक्त ठार वेडेच जातात किंवा आपण गेलो तर आपल्या मुलाला वेडा म्हणतील. परंतु अनेक संशोधनावरून हे सिद्ध झाले आहे की, उच्चार दोषांमध्ये समायोजन, भावनिक-मानसिक ताण यांचा मोठा वाटा असतो. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. मनात कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना न ठेवता तातडीने मार्गदर्शन घेतल्यास दोष लवकर नाहीसे होऊ शकतील. मूल आणि आईवडील यांना जी चिंता ग्रासून टाकते ती कमी होईल.


(४) मार्गदर्शनानुसार उच्चार होण्यासाठी वाणी तज्ज्ञांची (स्पिच थेरपीस्टची) मदत मोठ्या शहरांतून उपलब्ध असते. आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली, उच्चार तंत्रातले बारकावे समजून घेणे आवश्यक आहे. मुलांना एकटे न पाठवता स्वतः बरोबर जाऊन तंत्र शिकून घ्यावे म्हणजे घरी मुलांबरोबर बसून आवश्यक ती मेहनत करून घेऊ शकाल. या उपचारपद्धती म्हणजे जादू नव्हेत तेव्हा सातत्य, चिकाटी दाखविल्यास हळूहळू फरक पडतो जन प्रगती निश्चित होऊ शकते.

(५) काही शाळांमधून हल्ली मानसशास्त्र विषयाचे तज्झ सल्लागार या नात्याने काम करतात. शाळांमध्ये ज्या मुलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो; त्यांच्या पालकांशी शिक्षक संपर्क साधतात. सल्ला घेऊन उपाययोजना करता येते. पालकांनाही या दोषांमागील शास्त्रीय कारणे समजू शकतात.


(६) श्वसनाचे काही व्यायाम उच्चार सुधारण्यासाठी नेहमी उपयोगी पडू शकतात. पद्मासन घालून दीर्घ श्वसन करावयास शिकवावे. श्वास आत घेणे व बाहेर टाकणे या दोन्ही क्रियांना जास्तीत जास्त वेळ लावावा. तसेच श्वास काही वेळ रोखून ठेवून मगसोडणे यानेही फायदा होतो.


(७) मोठ्याने धडाधडा वाचन करणे याने आत्मविश्वास वाढतो.


(८) या कारणांसाठी मुलाला रागावणे किंवा टिंगल करणे योग्य नाही. या दोषामागचे कारण समजावून घेऊन, मन स्थिर ठेवून बोलावयास लावायचे..


९) लहानपणी संस्कृत किंवा प्रमाणित भाषेतील श्लोक, कविता पाठ म्हणून घेतल्यास उच्चार अधिक स्पष्ट व चांगले होऊ शकतात.


दोष लक्षात आल्यावर मुलाला न रागावता आधी तज्ज्ञ व्यक्तीकडून शारीरिक तपासणी करुन घ्यावी. ज्या अवयवांबाबत दोष आढळला असेल त्याबाबतीत तज्ज्ञांकडून पुढील सल्ला घ्यावा: असल्यास छोटी शस्त्रक्रिया करून घ्यावी. कर्णबधिर असेल तर त्यांच्या स्वतंत्रता प्रशिक्षित शिक्षक असतात त्यांची मदत घ्यावी. शारीरिक


तपासणीबरोबर मानसिक तपासणी आवश्यक असते. उच्चारदोषांमध्ये भावणिक आणि मानसिक यांचा मोठा वाटा असतो. तातडीने मार्गदर्शन घेतल्यास दोष लवकर नाहीसे हो शकतात.


मार्गदर्शन आवश्यक असते व उच्चारतंत्रातील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे. स्वःत तंत्र शिकून घ्यावे. सातत्य, चिकाटी दाखविल्यास हळूहळू फरक पडतो. प्रगती निश्चित होऊ शकते. सल्लागार या नात्याने काम करतात. शिक्षकांशी संपर्क साधतात. सल्ला घेऊन उपाययोजना करता येते. पालकांनाही या दोषांमधील शास्त्रीय कारणे समजू शकतात. श्वसनाचे काही व्यायाम उच्चार सुधारण्यासाठी नेहमी उपयोगी पडू शकतात. पद्मासन घालून दीर्घ श्वसन करावयास शिकवावे. श्वास आत घेणे व बाहेर टाकणे या दोन्ही क्रियांना जास्तीत जास्त वेळ लावावा. श्वास काही वेळ रोखून ठेवून मग सोडणे यानेही फायदा होतो. मोठ्याने धडाधडा वाचन करणे याने आत्मविश्वास वाढतो. मन स्थिर ठेवून बोलावयास लावायचे. कविता पाठ म्हणून घेतल्यास उच्चार अधिक स्पष्ट व चांगले होऊ शकतात.





🔹 मुलांच्या निर्णय मानण्याच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.


उत्तर- दांपत्यांना ती पालक होण्यास योग्य आहेत असे आपण ठरवले असेल आणि काही जोडपी पालकत्वाची जबाबदारी पेलण्यास योग्य नाहीत असे आपल्याला वाटले असेल, पण त्यांची पालकत्वाची जबाबदारी पेलण्याची तयारी आहे किंवा नाही याबद्दलचे निर्णय आपण कोणत्या निकषांच्या आधारे घेतलेत? साधारणतः खालील निकष विचारात घेता येतील -


(१) शारीरिक क्षमता व जैविक तयारी,


(२) मानसिक व भावनिक तयारी व उत्सुकता


(३) जबाबदारीच्या अनेक पैलूंची जाणीव व ती उचलण्यासाठी आर्थिक व कौटुंबिक पूर्वतयारी


(४) शेजाऱ्यांच्या साहाय्याची शक्यता. नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूतिपूर्व, प्रसूतीनंतरच्या काळात मिळणारी रजा.


अगदी प्रत्येक निकषाचा कसून विचार केला तर कदाचित कुणीही पालक बनण्यास लायक ठरणार नाही. परंतु आपले तयारी जास्तीत जास्त चांगली कशी करता येईल, असलेल्या उणिवांची भरपाई कशी करता येईल हे निकषाधारे तपासणे उपयुक्त ठरेल.


(अ) शारीरिक-जैविक क्षमता व तयारी

गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीला 'अंडपेशी' निर्माण करण्याची व पुरुषाला 'पुंबीजे' निर्माण करण्याची क्षमता लागते, हे आपण पुढे समजून घेणार आहोत. ही निर्मितीक्षमता येण्यासाठी स्त्री व पुरुषाचे शरीर आधी परिपक्क व्हावे लागते. साधारणपणे १५ ते १५ वर्षांपर्यंत मुलींची मासिक पाळी चालू होते. त्यानंतरच मुलगी प्रजोत्पादनास योग्य होते. साधारणपणे १५ ते १८ वर्षे या काळात पुरुषाच्या प्रजनन संस्थेतून पुंबीजे रेत पेशी बाहेर पडायला सुरुवात होते. मूल जन्माला घालण्याची, बाप बनण्याची शारीरिक क्षमता अशा वेळी पुरुषाला आली असे समजायला हरकत नाही.


अर्थात शारीरिक परिपक्वतेचे हे एकच लक्षण नव्हे. स्त्रीचा गर्भाशय व इतरही शारीरिक घडण अशी पाहिजे की, ती फलित स्त्रीबीजाचा स्वीकार करू शकेल. तसेच पुरुषाच्या शरीरात निर्माण होणारी पुंबीजांची संख्या गर्भसंभवासाठी योग्य असली पाहिजे. साधारणतः ही शारीरिक क्षमता स्त्रीला १८ व्या वर्षी पुरुषाला २१ व्या वर्षी येते. अशा तऱ्हेची क्षमता दोघांना असल्यावरच ती प्रजनन कार्यासाठी शारीरिक दृष्ट्या परिपक्क ली असे समजावे.


आ) सामाजिक व भावनिक परिपक्वता


शारीरिक पक्वतेबरोबरच मानसिक परिपक्वतेची जरुरी हे. आपल्याला बाळ हवे आहे म्हणजे आपल्याला कोणत्या स्थितीला तोंड द्यावे लागेल आणि मुलाला जन्म द्यायचा म्हणजे थोडासा त्याग करावा लागणारच याची दोघांना पुर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. बाळाच्या गरजा पुरविणे, त्याची आधी देखभाल करणे याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. स्वतःसाठी आतापर्यंत दिला जाणारा वेळ, अखंड झोप, स्वस्थपणे व वेळेवर

खाणेपिणे या सर्व गोष्टी बदलाव्या लागणार आहेत हे आधी नीट समजून घेऊन त्याप्रमाणे मनाची तयारी ठेवल्यास अपत्यजन्माचा आनंद ओसरणार नाही. आई-बाबांबरोबरच कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही या बदलाचे भान ठेवावे लागते.


(इ) आर्थिक तयारी


बाळाचा जन्म म्हणजे अधिक पैशाची तरतूद करावी लागणार. बाळाचे खाणेपिणे, कपडेलत्ते, संभाव्य आजार, बाळाच्या जरुरीच्या वस्तू, खेळणी, त्याचे शिक्षण या सर्वांसाठी आपण पैशाची काय सोय करणार आहोत किंवा आपली चाल मेळकत हे सर्व संभाव्य खर्च पेलायला पुरेशी आहे की नाही याची पूर्ण कल्पना आपल्याला जन्म देणाऱ्या दांपत्याला असली पाहिजे. आर्थिक तरतूद पुरेशी असल्यासच अपत्य जन्माची तयारी कारावी. म्हणजे पुढे आर्थिक तणाव व त्यातून निर्माण होणारे संघर्ष टाळता येतील.


(ई) इतर काही प्रासंगिक बाबी


कुटुंबामध्ये काही संघर्ष आहेत काय व त्यांचा बाळाच्या वाढीवर कसा ब कितपत परिणाम होईल याचा

विचारही मुलाला जन्म देण्यापूर्वी दांपत्याने केला पाहिजे. आई नोकरी करणारी असेल तर आपल्या गैरहजेरीत आपल्याला बाळाची सोय कशी करता येईल - घरी कुणी नात्याचे, विश्वासू माणूस आहे काय किंवा जवळपास मुलाला सांभाळणारे पाळणाघर आहे काय, अशांसारख्या सोयींची माहिती आधीपासून घेणे जरुर आहे.

ज्या ज्या संभाव्य अडचणी येतील त्यांवर काय तोडगे आहेत, त्यांची माहिती व ते तोडगे स्वीकारण्याची दोघांची मानसिक तयारी होईल तेव्हा अपत्य जन्माची क्षमता दांपत्याला आली आहे असे म्हणता येईल.





🔹अतिशिस्तीचे परीणाम स्पष्ट करा.


उत्तर- 'सांस्कृतिक औचित्याशी निगडित अशी आणखी एक गोष्ट म्हणजे मुलांना शिस्त लावण्याच्या तऱ्हा'


५ प्रत्येक पालक मुलाचे सामाजिकीकरण वेगवेगळ्या पद्धतींनी करतो. या पद्धतींचे मूळ बऱ्याच वेळा पालकांच्या बालपणाच्या अनुभवांत पालकांनी आपल्याला शिस्त लावताना ज्या कोण अवलंब केला असेल त्याच पद्धती पुष्कळ वेळा वाटतात. कधीकधी तर योग्य वाटत नसूनही आपल्या आई-वडीलांनी वापरलेल्या शिस्तीच्या पद्धती आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी वापरतात. त्यामुळेच काही पालक मुलांना ठोक देऊन शिस्त लावायला बघतात. तर काही प्रमाने त्यांना शिकवायला बघतात.


मुलांशी विचारविनिमय करून त्यांना सामाजिक वागणुकीचे - शिस्तीचे धडे देणारेही पालक आहेत. प्रभावी पालकत्व म्हणजे काय हे आपण शिकतो आहोत. या संदर्भात आपल्यालाही मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण वापरत असलेल्या स्वत:च्या पद्धती पारखून घ्याव्या लागतील. त्याचबरोबर त्या पद्धती आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य करण्यास साहाय्यभूत होतील किंवा नाही याचाही मागोवा घेणे योग्य ठरेल. शिस्त


लावण्याच्या पद्धतीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होइन ते सांगता येईल. कदाचित एखाद्या शिस्त लावण्याच्या पद्धतीचा परिणाम अनेक असू शकतील. त्यातून अनेक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. त्यातून अनेक उद्दिष्टे साध्य होऊ शकतील. तसेच काही शिस्त लावण्याचा पद्धतींच्या व दिलेल्या उद्दिष्टांचा मेळ बसत नाही असे तुम्हास वाटेल. 


अतिशिस्त


"फाजील लाडाची दुसरी बाजू म्हणजे अतिशिस्त". येथे मुलांनी काय खावे, कोणत्या वेळी खावे, कोणते कपडे घालावेत, कसे घालावेत, कोणाशी बोलावे, कसे बोलावे आदी सर्व बाबतीत काटेकोर नियम केलेले असतात व या काटेकोर नियमांप्रमाणे मूल जर वागले नाही तर त्याला शिक्षा मिळते. या अतिशिस्तीचा परिणाम काही वेळा मूल आक्रमक, बंडखोर बनण्यात होतो, तर काही वेळा ते गोगलगाय बनते. कोणीही काही सांगितले तरी ते मान्य करू लागते त्याच्यातले त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नाहीसे होते..


Post a Comment

0 Comments