YCMOU | पूर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यासाठी परीक्षा अर्ज भरणे सुरु...!

YCMOU | पूर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यासाठी परीक्षा अर्ज भरणे सुरु…!





1) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या हिवाळी / सत्रनिहाय परीक्षा डिसेंबर 2022 तिसऱ्या आठवड्यापासून आयोजित करण्याचे नियोजित आहे. सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑक्टोबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल या परीक्षेसाठी उपलब्ध शिक्षणक्रमांचा तपशील सोबत जोडला आहे तेवढ्याच शिक्षणक्रमांची परीक्षा आयोजन केले जाईल.. YCMOU Backlog exam 2022

2) 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पूनपरीक्षार्थीनी संबंधित शिक्षणक्रमांच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज दिनांक 27/09/2022 ते 14/10/2022 या कालावधीत विनाविलंब शुल्काशिवाय भरावयाचा आहे. तर विलंब शुल्कासह (Rs. 100/- सह) मुदत 15/10/2022 ते 21/10/2022 राहील यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ राहणार नाही.


3) सर्व शिक्षणक्रमांच्या पूर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे शुल्क खालीलप्रमाणे राहील. 

प्रमाणपत्र / पदविका / पदवी (व्यावसायिक/तांत्रिक/ सायन्स वगळून) लेखी परीक्षा रु. 130/- प्रती पेपर

पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्यावसायिक/तांत्रिक/सायन्सचे सर्व शिक्षणक्रम 

लेखी परीक्षा रु. 150/- प्रती पेपर 

प्रात्यक्षिक/व्हिवावोस (Viva) रु. 300/- प्रती पेपर

मार्कशीट फि. रु. 100/- प्रती सेमिस्टर/ प्रती वर्ष

विलंब शुल्क Rs. 100/

परीक्षा शुल्क जेवढे विषय नापास आहेत त्या सर्वांचे भरावे लागेल परीक्षा अर्ज व शुल्क प्रत्येक नापास सेमिस्टर वर्षांसाठी भरावा लागेल. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरताना Debit Card/Credit Card/Net/Banking या मार्फत परीक्षा शुल्क भरता येईल.


अर्ज भरण्याची लिंक



Post a Comment

0 Comments